-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असते.
-
झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेतील ‘महाराणी येसूबाई’ यांच्या भूमिकेमुळे प्राजक्ता घराघरात पोहोचली.
-
नुकतेच प्राजक्ताने सोशल मीडियावर आपले काही नवीन फोटो शेअर केले आहेत, जे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
-
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये प्राजक्ताचा एक वेगळा आणि स्टायलिश अवतार पाहायला मिळत आहे.
-
प्राजक्ताने सोनेरी रंगाचा हटके स्कर्ट, काळ्या रंगाचा टॉप आणि त्यावर मॅचिंग जॅकेट परिधान केले आहे.
-
प्राजक्ताचा हा नवा लूक पाहून चाहत्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
एका चाहत्याने लिहिले, “ताई, तू खूप सुंदर दिसत आहेस,” तर दुसऱ्याने “या हेअरस्टाईलमध्ये तू अगदी पंजाबी दिसतेयस” अशी दाद दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…