-
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) सध्या तिच्या एका खास फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
नाटक, मालिका, चित्रपट आणि आता वेब सीरिज अशा सर्वच माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर, शिवानी आता तिच्या फॅशन सेन्सने चाहत्यांची मनं जिंकत आहे.
-
शिवानीने नुकतेच तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून नेटकऱ्यांमध्ये त्याचीच चर्चा रंगली आहे.
-
या फोटोंमध्ये शिवानीने जांभळ्या रंगाची प्लेन जॉर्जेट साडी नेसली आहे.
-
जांभळ्या साडीतील लूकवर शिवानीने पैठणी कापडापासून तयार केलेला फूल डिझाईनचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या लूकला पूर्ण करण्यासाठी शिवानीने सोन्याच्या दागिन्यांचा साज केला आहे.
-
काही दिवसांपूर्वीच शिवानीची ‘बे दुणे तीन’ ही नवी कोरी वेब सीरिज ‘झी ५’ वर प्रदर्शित झाली आहे. ‘गोष्ट दोघांची आणि आनंदाची बातमी तिघांच्या येण्याची’ अशी टॅगलाईन असलेल्या या सीरिजला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…