-
रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपासून दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू होती.
-
रश्मिका व विजय आता अखेर २६ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघे राजस्थान येथील उदयपूरमध्ये लग्न करणार असून, त्यांच्या लग्नाला अनेक लोकप्रिय मंडळी उपस्थित राहणार आहेत.
-
रश्मिका व विजय राजस्थान येथे थाटामाटत आणि पारंपरिक पद्धतीने लग्न करणार आहेत. काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. दोघांच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरुवातही झाली आहे.
-
विजय देवरकोंडा व रश्मिका यांच्यापूर्वी कोणत्या सेलिब्रिटी कपलने राजस्थान येथे लग्न केलं आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
-
विजय व रश्मिका यांच्यापूर्वी प्रियांका चोप्रा-निक जोनस, कतरिना कैफ-विकी कौशल यांसारखे काही सेलिब्रटी कपल्स येथे लग्नबंधनात अडकले होते.
-
प्रियांका चोप्रा व निक जोनस – या दोघांचं आंतरधर्मीय लग्न असून, दोघांनी दोन्ही पद्धतीनं लग्न केलं आहे. प्रियांका व निक यांनी राजस्थान येथे हिंदू पद्धतीनं लग्न केलं होतं. २०१८ मध्ये दोघांचा लग्नसोहळा राजस्थान येथील उमैद भवन पॅलेस येथे पार पडला होता.
-
कतरिना कैफ व विकी कौशल – अलीकडेच आई-बाबा झालेल्या विकी-कतरिनानेही राजस्थान येथे शाही पद्धतीनं लग्न केलं. दोघांनी २०२१ मध्ये सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा येथे लग्नगाठ बांधली.
-
सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी – २०२३ मध्ये या जोडीनं राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यग्रह पॅलेसमध्ये लग्न केलं. काही दिवसांपूर्वीच कियारा व सिद्धार्थ यांच्या लेकीचा जन्म झाला.
-
हंसिका मोटवाणी – सोहेल कस्तुरीया – २०२२ मध्ये हंसिका मोटवाणी व सोहेल कस्तुरीया यांनी राजस्थान येथे मंडोटा फोर्ट अँड पॅलेस येथे लग्नगाठ बांधली. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…