-
यंदाचा ‘झी नाट्य गौरव २०२६’ (Zee Natya Gaurav Puraskar 2026) हा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात आणि उत्साहात पार पडला.
-
या सोहळ्यात लोकप्रिय अभिनेत्री तन्वी मुंडलेने (Tanvi Mundle) आपल्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
तन्वीने या पुरस्कार सोहळ्यासाठी सोनेरी रंगाची डिझायनर साडी नेसली होती.
-
केवळ सौंदर्यानेच नव्हे, तर तन्वीने आपल्या अभिनयानेही प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
-
‘कुटुंब किर्रतन’ (Kutumb Kirrtan) या नाटकातील भूमिकेसाठी तन्वी आणि अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यांना यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
-
गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित असलेल्या या नाटकाची टॅगलाईन “किर्रकिर्र करणाऱ्या नात्यांची कौटुंबिक कॉमेडी” अशी असून, या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
-
तन्वीच्या या यशाबद्दल तिच्या चाहत्यांनी आणि कलाविश्वातील सहकाऱ्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तन्वी मुंडले/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…