-
शक्ती कपूर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी आजवर विनोदी, सहाय्यक तसेच खलनायकाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
-
शक्ती कपूर यांनी पडद्यावर अनेक नायिकांसह काम केलं आहे. पण, त्यांच्या खऱ्या आयुष्यातील नायिकेला मिळवणं त्यांच्यासाठी तसं सोप नव्हतं.
-
शक्ती कपूर यांनी अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांची बहीण शिवांगी कोल्हापुरेंसह पळून जाऊन लग्न केलं.
-
शक्ती कपूर व शिवांगी यांच्या लग्नाला कोल्हापुरे कुटुंबीयांचा विरोध होता. कारण – शिवांगी या श्रीमंत कुटुंबातून येतात. तर शक्ती कपूर हे सामान्य पंजाबी कुटुंबातून होते.
-
कुटुंबीयांची परवानगी न मिळाल्याने शेवटी या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं.
-
एबीपीच्या वृत्तानुसार शक्ती कपूर याबद्दल म्हणालेले, “शिवांगी आणि मी पळून जाऊन लग्न केलं. आम्ही प्रेमात पडलो होतो, पण कुटुंबीयांचा विरोध होता म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न केलं. ती मराठी आहे आणि मी पंजाबी. मी खलनायकाची भूमिका साकारल्याने माझी वेगळी ओळख तायर झालेली आणि त्यांच्या कुटुंबीयांची सहमती नव्हती, म्हणून आम्हाला पळून जाऊन लग्न करावं लागलं.”
-
-
शिवांगी व शक्ती कपूर यांनी १९८२मध्ये पळून जाऊन कोर्ट मॅरेज केलं. शक्ती कपूर व शिवांगी कोल्हापुरे यांना लग्नानंतर दोन मुलं झाली.
-
शिवांगी व शक्ती यांच्या मुलांची नाव श्रद्धा व सिद्धांत आहेत. त्यांची लेक श्रद्धा बॉलीवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. (फोटो : इन्स्टाग्राम))
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…