-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ (Lagnanantar Hoilach Prem) ही मालिका सध्या रंजक वळणावर असून प्रेक्षकांकडून या मालिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेत लवकरच पार्थ-काव्या आणि जीवा-नंदिनी यांचा विवाहसोहळा रंगणार आहे.
-
या खास सोहळ्याच्या निमित्ताने कलाकारांनी नुकतेच केलेले आगळेवेगळे प्री-वेडिंग फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
या फोटोशूटसाठी कलाकारांनी विशेष थीम निवडल्याचे पाहायला मिळत आहे.
-
पार्थ आणि काव्या या जोडीने डेनिम जीन्स, पांढरा टी-शर्ट आणि लेदर जॅकेट असा कॅज्युअल लूक परिधान केला होता.
-
नंदिनीने लाल रंगाच्या आकर्षक गाऊनमध्ये, तर जीवाने काळ्या रंगाच्या फॉर्मल ब्लेझर सूटमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
या फोटोंना “प्रेमानंतरचं लग्न… या सुंदर प्रवासाची ही एक गोड सुरुवात!” असे सुरेख कॅप्शन देण्यात आले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…