-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने (Apurva Nemlekar) १४ फेब्रुवारी २०२६ रोजी तनुज गोवळकरबरोबर (Tanuj Govalkar) लग्नाची गाठ बांधली.
-
व्हॅलेंटाईन्स डेचे (Valentines Day) औचित्य साधून हा विवाहसोहळा अत्यंत थाटामाटात पार पडला.
-
लग्नानंतर आता अपूर्वाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर हळदीच्या सोहळ्यातील काही खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अपूर्वाच्या सौंदर्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
हळदीसाठी अपूर्वाने केशरी रंगाचा बांधणी लेहेंगा (Bandhani Lehenga) परिधान केला होता.
-
या लूकला अधिक उठावदार करण्यासाठी अपूर्वाने त्यावर आकर्षक फुलांच्या दागिन्यांचा (Floral Jewellery Look) साज केला होता.
-
दुसरीकडे, अपूर्वाचा पती तनुजने पिवळ्या रंगाचा बांधणी कुर्ता (Bandhani Kurta) परिधान करून अपूर्वाला उत्तम साथ दिली.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…