-
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag TV Serial) सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
-
या मालिकेतील ‘अस्मिता’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका दबाडे (Monika Dabade) सध्या तिच्या एका खास फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
मोनिकाने नुकतेच जांभळ्या रंगाच्या आणि गुलाबी काठ असलेल्या सुंदर पैठणी साडीत फोटोशूट केले आहे.
-
या मराठमोळ्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिने पारंपरिक दागिने, नथ आणि केसांत माळलेला मोगऱ्याचा गजरा असा साज केला आहे.
-
विशेष म्हणजे, या फोटोंमध्ये तिची चिमुकली लेक ‘वृंदा’ (Vrunda) देखील दिसत आहे.
-
माय-लेकीच्या या गोड केमिस्ट्रीवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.
-
मोनिकाने १५ मार्च २०२५ रोजी गोंडस मुलीला जन्म दिला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : मोनिका दबाडे/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…