-
मराठी भाषा दिन २७ फेब्रुवारीला साजरा होतो आहे. आपण जाणून घेऊ मराठी भाषेत आलेले खास दर्जेदार आणि उत्कृष्ट चित्रपट. श्वास हा असा चित्रपट आहे ज्याला सुवर्णकमळ पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटाची कथा आपल्या मनात घर करते.
-
डोंबिवली फास्ट या चित्रपटाने माणसाच्या जगण्यातलं वास्तव दाखवून दिलं. हा चित्रपट लोकांना आजही आवडतो यात शंका नाही.
-
या यादीतला दुसरा चित्रपट आहे हरिश्चंद्राची फॅक्टरी. दादासाहेब फाळकेंच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट मराठीतला मैलाचा दगड ठरला आहे यात शंका नाही.
-
नटरंग हा चित्रपटही एक चांगला सिनेमा म्हणून चर्चेत असतो. रवी जाधव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. (सर्व फोटो सौजन्य-फेसबुक)
-
मुंबई-पुणे-मुंबई हा देखील मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी अभिनित एक हलकाफुलका सिनेमा आहे. या चित्रपटाचे दोन पार्टही चर्चेत राहिले.
-
शाळा हा चित्रपट मिलिंद बोकिल यांच्या कादंबरीवर आधारलेला चित्रपट आहे. केतकी माटेगावकरने केलेला अभिनय हा चित्रपटाची जमेची बाजू आहे.
-
किल्ला हा चित्रपट वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे. अमृता सुभाष ने यात सुंदर अभिनय केला आहे.
-
जोगवा हा चित्रपट राजीव पाटील दिग्दर्शित आहे. या चित्रपटाची कथा राजन गवस यांच्या पुस्तकावरुन घेतली गेली आहे. या चित्रपटातील अभिनयासाठी उपेंद्र लिमयेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
-
नागराज मंजुळे दिग्दर्शित फँड्री या चित्रपटानेही रसिकांची मनं जिंकली आहेत. वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट प्रेक्षकांना आजही आवडतो.
-
देऊळ चित्रपटात गिरीश कुलकर्णी,, दिलीप प्रभावळकर, नाना पाटेकर, मोहन आगाशे असे दिग्गज कलाकार होते. गावाच्या बेगडी विकासावर भाष्य करणारा हा चित्रपट आजही लोकांच्या स्मरणात आहे.
-
कोर्ट हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला. एक वास्तवदर्शी चित्रपट म्हणून हा चित्रपट पाहिला गेला. या चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
-
सुहास शिरवाळकरांच्या दुनियादारी या कादंबरीवर आधारित त्याच नावाचा हा चित्रपट मराठीतला मल्टिस्टारर चित्रपट आहे.
-
सैराट चित्रपटाने महाराष्ट्रावर गारुड केलं होतं. यातली रिंकू राजगुरुची आर्ची ही भूमिका विशेष गाजली.
-
प्रवीण तरडे दिग्दर्शित मुळशी पॅटर्न हा चित्रपट शेतकऱ्यांचं धगधगतं वास्तव दाखवणारा आणि ज्वलंत समस्येवर बोट ठेवणारा चित्रपट ठरला आहे.
-
टेक केअर गुड नाईट या चित्रपटा मोबाइल क्रमांक आणि बँक डिटेल्स कळले तर कसा फ्रॉड होऊ शकतो, हॅकर काय काय करु शकतो तेदेखील केवळ मजा म्हणून यावर भाष्य करण्यात आलंय. (सर्व फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
-
कासव या चित्रपटातही नव्या पिढीला भेडसावणाऱ्या समस्यांवर भाष्य करण्यात आलं आहे.
-
ती सध्या काय करते हा चित्रपट पहिलं प्रेम, मग विखरुलेले मार्ग यांवर भाष्य करतो. एक संवेदनशील चित्रपट असं याचं वर्णन करता येईल.
-
मुरांबा हा चित्रपटही नात्यांवर भाष्य करतो. आत्ताच्या काळात नक्की पाहावा असा एक गोड सिनेमा आहे.
-
निशिकांत ही व्यक्तिरेखा जितेंद्र जोशी या चित्रपटात जगला आहे. हा चित्रपट एक गंभीर म्हणावा असाच आहे. काळजात घर करुन जातो. कुटुंब, श्रद्धा यावर भाष्य करतो.
-
वाळवी हा परेश मोकाशी दिग्दर्शित चित्रपट म्हणजे ब्लॅक कॉमेडी प्रकारात मोडणारा आहे. तरीही या चित्रपटाचा शेवट सून्न करतो.
-
सुमित्रा भावे सुनील सुकथनकर दिग्दर्शित या चित्रपटाचंही कौतुक मोठ्या प्रमाणावर झालं होतं. दिठीमधली किशोर कदम यांची भूमिका लक्षणीय ठरली होती.
-
अमृता सुभाष आणि अनिता दाते अभिनित जारण चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता, आहे आणि यापुढेही राहिल.
-
स्थळ हा चित्रपट विवाहसंस्थेवर चपखल भाष्य करणारा आणि एक वेगळा चित्रपट आहे. पाहिला नसेल तर आवर्जून पाहा.
-
दशावतार हा चित्रपटही दिलीप प्रभावळकरांच्या अभिनयासाठी पाहायलाच हवा असाच आहे. लोकांचा या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. ओटीटीवरही चित्रपट मोठ्या प्रमाणावर पाहिला गेला, जातो आहे.
-
उत्तर हा चित्रपट आई मुलाच्या नात्यावर भाष्य करतो. अभिनय बेर्डे आणि रेणुका शहाणे यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…