-
रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा यांचा शाही विवाहसोहळा आज ( २६ फेब्रुवारी ) राजस्थानमध्ये पार पडला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोघंही रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, इतक्या वर्षांत या दोघांनी कधीच आपल्या नात्याची कबुली दिली नव्हती.
-
आज लग्नाचे फोटो शेअर करत ‘विरोश’ने त्यांच्या सगळ्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. उदयपूरमध्ये कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि काही मोजक्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत विजय-रश्मिकाचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे.
-
रश्मिका-विजयने आज २६ फेब्रुवारीला सकाळी १० वाजून १० मिनिटांनी सात फेरे घेतले.
-
या दोघांचा विवाहसोहळा तेलुगू आणि कोडवा या दोन्ही परंपरेनुसार पार पडला आहे. विजय-रश्मिकाने लग्नसोहळ्यात पारंपरिक दाक्षिणात्य लूक केल्याचं पाहायला मिळत आहे.
-
लाल रंगाची साडी, गळ्यात सोन्याचे हार, बाजूबंद, कमरपट्टा, हातात पारंपरिक बांगड्या या लूकमध्ये रश्मिका अगदी राणीसारखी दिसतेय.
-
लग्न लागताना रश्मिकाला भरून आलं होतं, तिचे डोळे पाणावले होते. पत्नीचा हा सुंदर फोटो विजयने शेअर केला आहे.
-
रश्मिका-विजयच्या फोटोंवर चाहते “अखेर त्यांचं प्रेम जिंकलं” अशा कमेंट्स करत आहेत.
-
कारण, रश्मिका व विजय यांनी २०१८ मध्ये ‘गीता गोविंदम’ आणि २०१९ मध्ये ‘डिअर कॉम्रेड’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या.
-
गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात रश्मिका-विजयने हैदराबादमध्ये गुपचूप साखरपुडा उरकला होता. यानंतर आता थेट लग्नाच्या चार दिवस आधी या दोघांनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची पहिल्यांदा कबुली दिली.
-
आता ४ मार्चला विजय-रश्मिकाने हैदराबादमध्ये वेडिंग रिसेप्शनचं आयोजन केलं आहे. ( सर्व फोटो सौजन्य : रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा )
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…