-
संकर्षण कऱ्हाडे ‘आम्ही सारे खवय्ये’ कार्यक्रमातून संकर्षण प्रेक्षकांच्या भेटीला येतो.
-
तो या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आहे. त्यामध्ये मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार हजेरी लावतात.
-
काही खास पदार्थ बनवतात. त्यांच्या नात्यातील काही खास गोष्टी सांगतात, गप्पा मारतात, गमतीजमती सांगतात. त्यामुळे या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचे दिसत आहे.
-
अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा सध्या कुटुंब कीर्रतन या नाटकामुळे चर्चेत आहे.
-
वंदना गुप्ते, तन्वी मुंडले हे कलाकारदेखील या नाटकात प्रमुख भूमिका करत आहेत.‘कुटुंब कीर्रतन’ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-
आता या नाटकाच्या प्रयोगासाठी अभिनेता टीमसह ऑस्ट्रेलियाला गेला आहे.
-
तिथे पोहोचल्यानंतर अभिनेत्याने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
हे फोटो शेअर करताना त्याने मजेशीर कॅप्शनही लिहिले आहे. त्याने लिहिले, “परदेशात आलो कि, घरुन फोन आल्यावर एक प्रश्न ठरलेला असतो.तिकडे किती वाजलेत?असो,आता इकडे रात्र झाली आहे.”
-
पुढे त्याने लिहिले, “मी झोपतो, सकाळी उठलो कि, सगळ्यात आधी मी फोटोंना लाईक्स किती आलेत ते मोजणार आहे. प्रयोग परवा आहे. आज दिवसभर मज्जा केली. भेटूच.” (फोटो सौजन्य: संकर्षण कऱ्हाडे इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…