-
‘मुरांबा’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ खिरीड सध्या पत्नी डॉ. मैथिली भोसेकरसोबत पाचगणीच्या थंड हवेत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
२३ जानेवारी २०२६ रोजी विवाहबंधनात अडकल्यानंतर या जोडप्याची ही पहिलीच रोमँटिक सहल असून त्यांनी स्ट्रॉबेरी फार्मला भेट दिली.
-
सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो हातात टोपलीभर ताज्या स्ट्रॉबेरी घेऊन आनंदाने पोझ देताना दिसत आहे.
-
मैथिलीने या सहलीसाठी नारिंगी रंगाचा स्टायलिश वनपीस परिधान केला असून ती अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे.
-
नारिंगी रंगाच्या मॅचिंग आऊटफिटमध्ये हे नवविवाहित जोडपे निसर्गरम्य पाचगणीमध्ये एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडलेले दिसत आहे.
-
“पंचगणीची गोड सफर
स्ट्रॉबेरी तोडणे, स्वादिष्ट जेवण, थंड हवामान आणि त्याहूनही सुंदर सोबत.” अशा शब्दांत सिद्धार्थने या सहलीचे वर्णन आपल्या पोस्टमध्ये केले आहे. -
‘मुरांबा’ मालिकेतील त्याच्या अभिनयावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
स्ट्रॉबेरी पिकिंगसोबतच या जोडीने पाचगणीतील निसर्गरम्य वातावरण आणि तिथल्या खास खाद्यपदार्थांचा मनमुराद आस्वाद लुटला.
-
(सर्व फोटो सौजन्य: सिद्धार्थ खिरीड/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…