-
आपल्या अतरंगी फॅशनमुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहणारी उर्फी जावेद.
-
उर्फीने यावेळी कापडाचा नाही तर चक्क १०० किलो वजनाचा खाण्यायोग्य केकचा ड्रेस परिधान केला आहे.
-
या काळ्या रंगाच्या भव्य गाऊनवर चॉकलेट आणि क्रीमचा वापर करून अत्यंत आकर्षक नक्षीकाम करण्यात आले आहे.
-
हा ड्रेस इतका जड आहे की तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी खाली चाके (wheels) लावण्यात आली आहेत.
-
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये उर्फी स्वतः या ड्रेसमधील केक लोकांना भरवताना दिसत आहे.
-
फॅशन आणि फूड यांचा अनोखा संगम सादर करत तिने एक वेगळाच ट्रेंड सेट केल्याची चर्चा सुरू आहे.
-
कार्यक्रमात उपस्थित असलेले लोक या ड्रेसचा भाग चमच्याने खाताना पाहून नेटकरी चकित झाले आहेत.
-
आपल्या अतरंगी फॅशनसाठी ओळखल्या जाणाऱ्या उर्फीने या ‘गोड’ ड्रेसमुळे पुन्हा एकदा इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: उर्फी जावेद/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…