-
मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोडी अनुष्का पिंपुटकर आणि मेघन जाधव सध्या त्यांच्या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी थायलंडला रवाना झाले आहेत.
-
थायलंडच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावरून अनुष्काने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अनुष्का पांढऱ्या रंगाचा स्टायलिश क्रॉप टॉप आणि मरून शॉर्ट्समध्ये अतिशय ग्लॅमरस आणि फ्रेश दिसत आहे.
-
तिने डोळ्यांवर काळा गॉगल लावून बीचवरील निवांत क्षणांचा आनंद घेतानाचे सुंदर पोजेस चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
अनुष्काने या फोटोंना ‘रोमँटिसाइजिंग माय लाईफ, वन बीच डे अॅट अ टाइम’ असे अतिशय सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
समुद्रकिनाऱ्यावर बसून तिथल्या चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतानाचा तिचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
-
चाहत्यांनी या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला असून, मेघन आणि अनुष्काची जोडी थायलंडमध्ये कशी धमाल करत आहे, हे जाणून घेण्यास ते उत्सुक आहेत.
-
लग्नानंतरचा हा हनिमून पीरियड हे कपल अतिशय साध्या, पण तितक्याच देखण्या पद्धतीने एन्जॉय करताना फोटोंमधून स्पष्ट दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अनुष्का पिंपुटकर/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…