-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळेने सोशल मीडियावर तिचे सुंदर साडीतील नवीन फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंमध्ये हृताने आकाशी रंगाची जरतारी साडी परिधान केली असून, तिचा हा पारंपरिक लूक अत्यंत मोहक दिसत आहे.
-
हृताने हातात पांढऱ्या फुलांचा गुच्छ धरला असून ‘लाईफ इज बेटर विथ फ्लॉवर्स’, अशी कॅप्शन या पोस्टला दिली आहे.
-
साडीवर तिने गळ्यात मोत्यांचा हार आणि कपाळावर छोटी टिकली लावून आपला लूक पूर्ण केला आहे.
-
‘दुर्वा’, ‘फुलपाखरू’ व ‘मन उडू उडू झालं’ या गाजलेल्या मालिकांमुळे हृता महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय झाली आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या हृताच्या या फोटोंवर काही तासांतच लाखो लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे.
-
मालिकांनंतर ‘अनन्या’ व ‘टाइमपास ३’सारख्या चित्रपटांतून हृताने आपल्या अभिनयाची चुणूक मोठ्या पडद्यावरही दाखवली आहे.
-
हृताच्या साडीतील सौंदर्याने तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा भुरळ घातली असून, तिचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: हृता दुर्गुळे/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…