-
मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) सध्या तिच्या एका खास लूकमुळे चर्चेत आहे.
-
टेलिव्हिजनमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या मृणालने आज सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
नुकतेच मृणालने सोशल मीडियावर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
-
यात मृणालने अबोली रंगाचा साधा पण अत्यंत मोहक लेहेंगा परिधान केला आहे.
-
केसात माळलेला अबोलीच्या फुलांचा गजरा मृणालच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे.
-
मृणालच्या या पारंपारिक दाक्षिणात्य लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला असून सोशल मीडियावर हे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
विशेष म्हणजे, नुकताच म्हणजेच २० फेब्रुवारी २०२६ रोजी मृणालचा ‘दो दिवाने शहर में’ (Do Deewane Seher Mein) हा नवा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृणाल ठाकूर/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…