-
उन्हाळ्यात कलिंगडाचा लालसर गोड गर आवडीने खाल्ला जातो. मात्र, त्यानंतर हिरवट-पांढरी साल बहुतांश वेळा टाकून दिली जाते. प्रत्यक्षात या सालीतही अनेक पोषक गुणधर्म दडलेले असतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
त्यामुळे कलिंगडाची साल वाया न घालवता, तिचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
तज्ज्ञांच्या मते, कलिंगडाच्या सालीत अमिनो आम्ल आढळते, जे शरीरातील युरिया चक्र नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे रक्तातील नायट्रोजन मूत्राद्वारे बाहेर टाकण्याची प्रक्रिया सुलभ होते. यामुळे शरीर शुद्ध राहण्यास मदत होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
तसेच सालीचे सेवन केल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास हातभार लागतो आणि हृदयाचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
साल थेट खाण्याबरोबरच तिचे लोणचे किंवा पौष्टिक पेयही तयार करता येते. हे पेय सकाळी किंवा संध्याकाळी घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि शरीराला ताजेतवाने ठेवण्यास मदत होते. (
-
कलिंगडाच्या सालीचे पौष्टिक पेय कसे बनवावे?
साहित्य : तीन कप पाणी, तीन कप कलिंगडाची सोलून घेतलेली साल (तुकडे करून), दोन मोठे चमचे चिया बिया, दोन कप आंब्याचे तुकडे, अर्धा मोठा चमचा दालचिनी पूड, स्ट्रॉबेरी. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
सर्व साहित्य एकत्र मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्या. नंतर त्यात थोडा बर्फ घालून पुन्हा एकदा फिरवा, जेणेकरून मिश्रण एकजीव होईल. तयार पेय काही वेळ थंड ठेवून नंतर थंडगार स्वरूपात सेवन करा. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
दररोज या पौष्टिक पेयाचे सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि चवीलाही आनंददायी ताजेपणा मिळतो. कलिंगडाच्या सालीचा असा उपयोग केल्यास अन्नाची नासाडीही टळते आणि आरोग्यालाही दुहेरी फायदा होतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
( टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…