-
अभिनेत्री नेहा पेंडसेने ‘तिघी’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉंच सोहळ्यासाठी हा खास लाल रंगाचा साडी लूक केला होता.
-
‘तिघी’ या सिनेमात नेहा पेंडसेसोबतच सोनाली कुलकर्णी आणि भारती आचरेकर या दिग्गज अभिनेत्री प्रमुख भूमिकांत आहेत.
-
या चित्रपटात तीन वेगवेगळ्या पिढ्यांतील अभिनेत्री एकत्र येत असल्याने प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची मोठी चर्चा आहे.
-
ट्रेलर लॉंचसाठी नेहाने नेसलेली नक्षीदार पटोला साडी आणि तिचे ऑक्सिडाइज्ड दागिने तिच्या सौंदर्याला अधिक खुलवत होते.
-
साडीसोबतच नेहाचा मेकअप आणि हेअरस्टाईल तिच्या या लूकला अधिक उठावदार बनवत होती.
-
‘तिघी’ या सिनेमाच्या निमित्ताने नेहा पेंडसे पुन्हा एकदा एका सशक्त भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
नेहाने तिचे हे खास फोटो शेअर करताना ‘Tighee trailer launch’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
या चित्रपटात नेहा, सोनाली व भारती आचरेकर यांच्यातील अभिनयाची जुगलबंदी पाहणे प्रेक्षकांसाठी खास पर्वणी ठरणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: नेहा पेंडसे/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…