-
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री आणि नृत्यांगना अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) सध्या तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या अमृताने नुकतेच तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत, जे सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंमध्ये अमृताने गुलाबी रंगाचा चिकनकारी ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेसवर अमृताने निवडलेले ऑक्सिडाइज्ड दागिने तिचे सौंदर्य अधिकच खुलवत आहेत.
-
या फोटोंबरोबरच अमृताने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ‘आज के मौसम का मूड’ असे म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
अमृता सध्या तिच्या ‘लग्नपंचमी’ (Lagna Panchami) या नव्या नाटकामुळे व्यस्त आहे. लेखिका मधुगंधा कुलकर्णी आणि दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे नाटक आकाराला आलं आहे.
-
विशेष म्हणजे, या नाटकात प्रेक्षकांना स्वप्निल जोशी आणि अमृता खानविलकर यांची फ्रेश केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…