-
अभिनेत्री सुखदा खांडकेकरने नुकतेच समुद्रकिनारी काढलेले तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री सुखदा खांडकेकरने समुद्रकिनारी केशरी रंगाचा ‘बांधणी’ प्रिंट असलेला ग्लॅमरस हॉल्टर नेक टॉप परिधान करून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
-
पांढऱ्या रंगाची फ्लेअर्ड शरारा पॅन्ट आणि त्याला असलेली सोनेरी किनार सुखदाच्या या ‘इंडो-वेस्टर्न’ लूकला अधिकच उठावदार बनवत आहे.
-
हातात घेतलेली पांढरी ओढणी आणि वाऱ्याने विखुरलेले केस यांमुळे सुखदाचे हे फोटोशूट सोशल मीडियावर सध्या प्रचंड चर्चेत आहे.
-
समुद्रकिनाऱ्यावरील खडकांवर बसून दिलेली ही मनमोहक पोज सुखदाच्या सौंदर्यात आणि तिच्या नजाकतीत भर घालत आहे.
-
अभिनयासोबतच सुखदा एक उत्तम शास्त्रीय नृत्यांगना असल्याने तिच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळीच लयबद्धता दिसून येते.
-
मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीत सुखदाने आपल्या कसदार अभिनयाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
अभिनयाबरोबरच सुखदा तिच्या उत्कृष्ट साडी सेन्ससाठी ओळखली जाते. मात्र, यावेळी तिने या लूकमध्येही सर्वांना घायाळ केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सुखदा खांडकेकर/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…