-
सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या संपूर्ण टीमने यंदाची रंगपंचमी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली.
-
निमित्त होते “हास्यजत्रेची रंगपंचमी – खेळ खेळूया होळीचा” या विशेष कार्यक्रमाचे.
-
या सोहळ्यात रंगांबरोबरच हास्याचाही तुफान वर्षाव पाहायला मिळाला.
-
कार्यक्रमाचे दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
-
यावेळी समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शिवाली परब, ओंकार राऊत यांच्यासह निखिल बने, दत्तू मोरे आणि हास्यजत्रेच्या सर्वच शिलेदारांनी एकत्र येत रंग, संगीत आणि नृत्याचा आनंद लुटला.
-
केवळ कलाकारच नव्हे, तर कार्यक्रमाची संगीत टीमही या उत्सवात हिरिरीने सहभागी झाली होती.
-
या खास सोहळ्यात कलाकारांनी केवळ रंगांची उधळणच केली नाही, तर ढोल-ताशांच्या ठेक्यावर धम्माल डान्स आणि गाणी गात वातावरण अधिक रंगतदार केले.
-
एकमेकांबरोबर मजेशीर खेळ खेळत आणि हास्यविनोद करत या टीमने रंगपंचमीचा आनंद द्विगुणित केला.
-
यावेळी सोनी मराठी आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ परिवारातर्फे जगभरातील प्रेक्षकांना होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
-
या संपूर्ण सेलिब्रेशनची खास झलक प्रेक्षकांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या आगामी भागात पाहता येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनी मराठी/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…