-
साजिरी जोशीने २०२५ मध्ये ‘एप्रिल मे 99’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. रोहन मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटाचे प्रचंड कौतुक झाले.
-
साजरीचा हा पहिला चित्रपट असला तरी तिने तिच्या अभिनयातून, तिच्या भूमिकेतून सर्वांची मने जिंकली.
-
चित्रपटात उन्हाळ्याची सुट्टी, कोकण, तीन मित्रांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत ठरवलेला प्लॅन आणि जाईच्या एन्ट्रीमुळे त्यांच्या प्लॅनमध्ये झालेला बदल अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. प्रेक्षकांचे मन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये रमते. मित्रांची मैत्री पाहायला मिळते. रुसवे-फुगवे पाहायला मिळतात आणि आपापसातलं प्रेमही पाहायला मिळतं, त्यामुळे या चित्रपटाची आजही चर्चा होताना दिसते.
-
हा चित्रपट जेव्हा ॲमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला, त्यावेळीदेखील चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
-
‘एप्रिल मे 99’ या चित्रपटानंतर साजिरी जोशी ‘बाई तुझ्या पायी’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित या वेब सीरिजमधील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्याचे पाहायला मिळाले.
-
झी ५ वर प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजमध्ये क्षिती जोग, शिवराज वायचळ आणि इतर अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले.
-
साजिरी जोशी आता चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तिला नुकताच झी चित्र गौरवचा प्रतिभाशाली सर्वोत्कृष्ट पदार्पण हा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
-
साजिरी जोशीची आई म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री ऋजुता देशमुखने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लेकीवर कौतुकाचा वर्षाव केला.
-
साजरी जोशी सध्या ‘छोटे उस्ताद’ या कार्यक्रमाच्या चौथ्या पर्वाचे सूत्रसंचालन करत आहे; तर ऋजुता देशमुख स्टार प्रवाह वरच्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. (सर्व फोटो सौजन्य: साजिरी जोशी इन्स्टाग्राम)
मराठी अभिनेत्रीने दुसऱ्या लग्नानंतर ३ महिन्यांनी दिली गुड न्यूज, ‘तो’ व्हिडीओ शेअर करत म्हणाली…