-
बॉलीवूड अभिनेत्रींचे लग्न म्हटलं की त्यांचे वेगवेगळे लूक, डिझायनर दागिने आणि महागडे कपडे. हे आलंच. अभिनेत्रींच्या लग्नातील लुकची नेहमीच चर्चा होत असते.
-
सध्या अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या लग्नातील लूकची चर्चा सुरू आहे. अभिनेत्रीने विजय देवरकोंडासह पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. त्यामुळे सध्या दोघांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहेत. पण, तुम्हाला माहित आहे का रश्मिकापूर्वी बॉलीवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या लग्नातील डिझायनर कपड्यांवर लाखो रुपये खर्च केले होते.
-
सुरुवात करूयात ऐश्वर्या रायच्या लग्नातील लूकपासून. ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसह पारंपारिक पद्धतीने लग्न केलं होतं. लग्नात तिने दाक्षिणात्य पद्धतीची जवळपास ७५ लाखांची कांजीवरम साडी नेसल्याचं म्हटलं जातं.
-
सोनम कपूर – सोनम कपूरच्या लुक्सची नेहमीच चर्चा होत असते. अभिनेत्रीनेसुद्धा तिच्या लग्नामध्ये पारंपरिक लूक केला होता. तिने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता ज्याची किंमत ७० लाख रूपये असल्याचं म्हटलं जातं.
-
बॉलीवूड मधील अभिनेत्री भडक रंगाच्या लेहेंग्यांना पसंती देत असताना त्याचवेळी अनुष्का शर्माने मात्र पेस्टल रंगाला पसंती देत तिच्या लग्नामध्ये बेबी पिंक कलरचा साब्यसाची या ब्रँडचा लेहेंगा परिधान केला होता. ज्याची किंमत ३० लाख रुपये असल्याचं म्हटलं जातं.
-
दीपिका पादुकोण बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. परंतु, दीपिकाने तिच्या लग्नामध्ये इतर अभिनेत्रींच्या तुलनेत स्वस्त लेहेंगा खरेदी केला होता. तिने लाल भडक रंगाचा १२ लाखांचा लेहेंगा तिच्या लग्नात परिधान केला होता. रणवीर सिंह व दीपिका यांनी इटलीमध्ये लग्न केलं होतं.
-
आलिया भट – आलिया भट व रणबीर कपूर यांनीसुद्धा त्यांच्या लग्नात ऑफ वाईट रंगाच्या पारंपरिक पद्धतीच्या कपड्यांना पसंती दिली होती. आलियाने ऑफ व्हाईट रंगाची ऑरगॅनजा साडी नेसली होती. तर रणबीरनेही त्याच रंगाची शेरवानी परिधान केली होती. आलियाच्या या सब्यसाचीच्या साडीची किंमत ५० लाख रूपये असल्याचं म्हटलं जातं.
-
प्रियांका चोपरा – अभिनेत्री प्रियांका चोप्रा व निक जोनस यांनी दोन पद्धतीने लग्न केलं. प्रियांकाने भारतात हिंदू पद्धतीने तर अमेरिकेत ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. भारतीय पद्धतीने लग्न करताना तिने लाल भडक रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. ज्याची किंमत १८ लाख असल्याचं म्हटलं जातं.
-
कतरिना कैफ – कतरिनाने तिच्या लग्नात लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. ज्याची किंमत १७ लाख रुपये असल्याचं म्हटलं जातं. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…