-
मराठी आणि हिंदी कलाविश्वात आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
निमित्त आहे मयुरीचे ‘सविता दामोदर परांजपे’ (Savita Damodar Paranjape Natak) हे नव्याने रंगभूमीवर आलेले नाटक आणि तिचा खास साडीतील लूक.
-
१९८५ साली १२०० हून अधिक प्रयोग करून इतिहास रचणारे अजरामर नाटक ‘सविता दामोदर परांजपे’ तब्बल ४० वर्षांनंतर पुन्हा एकदा नव्या संचासह प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
-
“एक चेहरा… दोन अस्तित्व – सविता की कुसुम? नेमकं हे गूढ आहे तरी काय..!” अशी या सस्पेन्स थ्रिलर नाटकाची टॅगलाईन असून, मयुरी यात मुख्य भूमिका साकारत आहे.
-
या नाटकाच्या प्रमोशनसाठी मयुरीने तिच्या सहकलाकारांसह झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘आम्ही सारे खवय्ये’मध्ये हजेरी लावली होती.
-
यावेळी मयुरीच्या सौंदर्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने या कार्यक्रमासाठी गडद लाल रंगाची सुंदर साडी (Red Saree Look) नेसली होती.
-
या लूकवर मयुरीने ऑक्सिडाइज्ड दागिन्यांचा साज केला होता, जो तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : मयुरी देशमुख/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…