-
अभिनेत्री मृणाल ठाकूरने तिच्या साध्या, पण तितक्याच प्रभावी सौंदर्याने पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ केले आहे.
-
तिरुपती, आंध्र प्रदेश येथील या फोटोंमध्ये मृणालने अतिशय सुंदर अशी क्रीम आणि गुलाबी रंगाची रेशमी साडी परिधान केली आहे.
-
तिच्या या पारंपरिक साडीवर असलेले सोनेरी काठ तिच्या सौंदर्याला एक राजेशाही लूक देत आहेत.
-
मृणालने या साडीवर मॅचिंग गुलाबी रंगाचा ब्लाऊज घातला असून, त्यावर नाजूक विणकाम दिसून येते.
-
तिच्या दागिन्यांबद्दल बोलायचे झाले, तर तिने कानात जड सोन्याची झुमकी आणि हातात साध्या बांगड्या घालून लूक पूर्ण केला आहे.
-
कपाळावर छोटी टिकली आणि मोकळे सोडलेले कुरळे केस तिच्या या सात्त्विक सौंदर्यात भर घालत आहेत.
-
सोशल मीडियावर हे फोटो शेअर करताना तिने ‘सरस्वती और उनकी सहेलियाॅं’ अशी अतिशय गोड कॅप्शन दिली आहे.
-
मराठी ते दाक्षिणात्य सिनेसृष्टीपर्यंत आपला ठसा उमटवणाऱ्या मृणालचा हा ‘देसी अवतार’ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: मृणाल ठाकूर/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…