-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विशाल निकम (Vishal Nikam) आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर (Akshaya Hindalkar) नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत.
-
१० फेब्रुवारी २०२६ रोजी या जोडीने आयुष्याची नवी सुरुवात केली.
-
विशाल आणि अक्षयाचा विवाहसोहळा उत्तराखंड येथील ऐतिहासिक आणि पवित्र त्रियुगीनारायण मंदिरात संपन्न झाला.
-
हिंदू मान्यतेनुसार, याच ठिकाणी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. या पवित्र स्थळाचे साक्षीदार होत या जोडीने सात फेरे घेतले.
-
लग्नानंतर अक्षयाने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यांनी सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंना अक्षयाने अत्यंत साजेसं आणि रोमँटिक कॅप्शन दिलं आहे. ती म्हणते, “तू माझ्यात जी सुंदरता बघतोस… ती तुझीच सावली आहे…”
-
या फोटोंमध्ये अक्षयाने पांढऱ्या रंगाचा सुंदर प्रिंटेड कॉटन को-ऑर्ड सेट परिधान केला असून, तिचा हा ‘सिंपल लूक’ चाहत्यांना खूप भावत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षया हिंदळकर/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…