-
मराठी कलाविश्वातील लाडकी जोडी अभिनेत्री गिरीजा प्रभू (Girija Prabhu) आणि अभिनेता मंदार जाधव (Mandar Jadhav) पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.
-
निमित्त आहे गिरीजा व मंदारच्या ‘तू चांदवा’ (Tu Chandwa Song) या नवीन गाण्याचे.
-
‘सारेगामा मराठी’च्या यूट्यूब चॅनेलवर हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून, सोशल मीडियावर या जोडीच्या रोमँटिक फोटोंनी सध्या धुमाकूळ घातला आहे.
-
‘तू चांदवा’ हे गाणे लोकप्रिय हिंदी गाणे ‘Gehra Hua’ चे मराठी रूपांतर आहे.
-
शाश्वत सचदेव यांच्या सुमधुर संगीताने सजलेल्या या गाण्याला प्रेक्षकांकडून पसंतीची पावती मिळत आहे.
-
प्रेमाच्या भावनांना नव्याने उजाळा देणारे हे गाणे सध्या युथमध्ये विशेष चर्चेत आहे.
-
गाण्याच्या प्रमोशनसाठी गिरीजाने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत. यात ही जोडी समुद्रकिनारी रोमँटिक अंदाजात दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…