-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) लवकरच ‘तिघी’ (Tighee Movie) या बहुप्रतिक्षित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
सध्या या चित्रपटाचे प्रमोशन जोरात सुरू असून, सोनालीच्या स्टायलिश लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
गेल्या दशकभरापासून चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेल्या जीजिविषा काळे या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पाऊल ठेवत आहेत.
-
या चित्रपटात सोनालीबरोबरच ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर आणि नेहा पेंडसे-बायस यांच्या मुख्य भूमिका आहेत.
-
आई आणि तिच्या दोन मुलींची गोष्ट सांगणारा ‘तिघी’ हा चित्रपट ६ मार्चला प्रदर्शित होणार आहे.
-
प्रमोशनच्या निमित्ताने सोनालीने गडद लाल रंगाची फ्लोरल प्रिंटेड साडी परिधान केली होती.
-
सोनालीने साडीतील लूकवर मॅचिंग व्ही-नेक स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान करून आपला लूक पूर्ण केला.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…