-
विजय देवरकोंडा व रश्मिका मंदाना ही जोडी सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहे. २६ फेब्रुवारी रोजी त्यांनी उदयपूर येथे थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीनं लग्न केलं. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहेत. लग्नातील दोघांच्या लूकची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे.
-
विजयनं पारंपरिक पद्धतीचा, पण शाही थाट असणारा लूक केला होता. त्यानं लाल रंगाचा शेला आणि त्याखाली पांढऱ्या रंगाचं धोतर परिधान केलं होतं. महत्त्वाची बाब म्हणजे त्यावर त्यानं साजेसे आणि डिझायनर दागिने परिधान केले होते, ज्यामुळे त्याच्या लूकनं सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. तर, रश्मिकानंही भगव्या रंगाची साडी आणि त्यावर ठसठशीत दिसणारे पारंपरिक पद्धतीचे दागिने परिधान केले होते.
-
एरवी सेलिब्रिटींच्या लग्नात अभिनेत्रींच्या लूकची चर्चा होते; परंतु यावेळी मात्र विजयच्या लूकची अधिक चर्चा झाली. कारण- त्यानं कानापासून पायांपर्यंत सर्व प्रकारचे दागिने परिधान केले होते. पण, तुम्हाला माहीत आहे का, त्यांचे हे दागिने बनायला १० महिने लागले. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.
-
विजयने लग्नात कानातले, कमरपट्टा, बाजूबंद, दोन नेकलेस, हातात कडे, पायांत तोडे आणि बोटांमध्ये अंगठ्या, असा एकंदर राजेशाही थाट असलेला लूक त्याने केला होता.
-
रश्मिकाच्या दागिन्यांबद्दल बोलायचं झालं, तर तिनं एकूण ११ दागिने परिधान केले होते. अभिनेत्रीनं चोकर, झुमके, हाथफुल, माथापट्टी, नथ, बांगड्या, बाजूबंद, कमरपट्टा, पैंजण, मोठा हार आणि चंपासरळू असे पारंपरिक पद्धतीचे दागिने परिधान केले होते.
-
रश्मिका व विजय यांच्या या दागिन्यांनी अनेकांचं लक्ष वेधलं गेलं होतं. विजय व रश्मिका यांच्या दागिन्यांची किंमत Inextliveच्या माहितीनुसार कोट्यवधींमध्ये असल्याचं म्हटलं जातं.
-
रश्मिकानं लग्नात परिधान केलेल्या ‘या’ सोन्याच्या दागिन्यांची किंमत तब्बल सात कोटी असल्याचं म्हटलं जात आहे.
-
रश्मिकानं लग्नात हिरेजडित दागिने परिधान न करता, पारंपरिक पद्धतीच्या सोन्याच्या दागिन्यांना प्राधान्य दिल्यानं तिचं कौतुक होत आहे.
-
रश्मिका व विजय यांनी लग्नानंतर देशभरातील त्यांच्या चाहत्यांना मिठाईच्या डब्यांचे वाटप केले आणि लग्नानंतर दोघांनी नुकतंच हैदराबाद येथे देवदर्शन घेतलं. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…