-
हल्ली स्कीन केअरची सर्वत्र वेगळीच क्रेझ आहे. प्रत्येक जण त्यांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी वेगवेगळे प्रॉडक्ट वापरत असतात.
-
कलाकारही १२-१२ तास चेहऱ्यावर मेकअप लावत असल्याने त्यांच्या स्कीन केअरचा वेगळा रूटीन असतो. जो ते नियमीतपणे फॉलो करत असतात. काही कलाकार स्कीनसाठी घरघुती उपायही करतात.
-
अशातच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा प्रभूने तिचा स्कीन केअर रूटीन सांगितला आहे. यावेळी तिने ती घरच्या घरी स्कीनसाठी काही उपाय करते याबद्दल सांगितलं आहे.
-
अभिजात मराठीला दिलेल्या मुलाखतीत गिरीजा स्कीन केअर रूटीनबद्दल म्हणाली, “मी आधी फार स्कीन केअरसाठी काही करायचे नाही.आधी तर सनस्क्रीनही लावायचे नाही. पण आता मी ते नियमीतपणे करते. कारण मला त्याचं महत्त्व कळलं आहे.”
-
गिरीजा पुढे म्हणाली, “मी रात्री झोपताना काही लावत नाही. पण, माझी आई घरी व्हायटमीन ई असलेली पेस्ट बनवते, कुंकुमादी तेलही आहे एक ते लावते. पण, कधी कधी मी काहीच लावत नाही. कारण – सतत चेहऱ्यावर मेकअप असल्याने त्वचेला थोडा आराम त्यासाठी मी काहीच लावत नाही.”
-
मी डाएटही नीट करते ज्यामुळे चेहऱ्यावर त्याचा फरक दिसतो. आधी मी नियमीतपणे काळजी घ्याचे नाही. पण, आता मी सगळं नीट करते.
-
गिरीजा प्रभू मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. ती अभिनयासह एक उत्तम नर्तिकासुद्धा आहे.
-
गिरीजाने या मुलाखतीत इंडस्ट्रीत काम करत असल्याने येणाऱ्या स्ट्रेसकडे ती कसं पाहते याबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली, “प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात. पण, इतरांच्या समस्या पाहिल्यानंतर मला माझ्या समस्या खूप लहान वाटतात. त्यामुळे आयुष्य छान जगून घालवूया फक्त स्ट्रेस घेण्यात काहीच अर्थ नाहीये.”
-
गिरीजा सोशल मीडियावरही खूप सक्रीय असते आणि त्यामार्फत ती तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी चाहत्यांसह शेअर करत असते. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…