-
मराठी मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन आणि प्रेक्षकांची आवडती जोडी म्हणून सचिन व सुप्रिया पिळगांवकर यांच्याकडे पाहिलं जातं.
-
या दोघांच्या लग्नाला अलीकडेच ४० वर्षे पूर्ण झाली. आई-बाबांच्या लग्नाला ४० वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने श्रिया पिळगांवकरने एक फॅमिली ट्रिप प्लॅन केली होती. याचे सुंदर फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
श्रिया तिच्या आई-बाबांबरोबर व्हिएतनाम फिरायला गेली होती. या ट्रिपदरम्यान या तिघांनीही खूप धमाल केली.
-
व्हिएतनाममधील विविध पदार्थ, निळेशार सुमद्रकिनारे, बोटिंग, सायकलिंग, या देशातील नयनरम्य जागा या सगळ्याची झलक श्रियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
पिळगांवकर कुटुंबाने व्हिएतनाममधील प्रसिद्ध Hanoi street ला सुद्धा भेट दिली.
-
या ट्रिपदरम्यान श्रियाने तिच्या आई-बाबांचे खूपच सुंदर फोटो काढले आहेत.
-
पिळगांवकरांच्या व्हिएतनाम ट्रिपचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
“माझ्या आई-बाबांच्या लग्नाला अलीकडेच ४० वर्ष पूर्ण झाली. म्हणूनच या खास ट्रिपचं प्लॅनिंग मी केलं होतं. आपल्या पालकांना अशाप्रकारे बाहेर फिरायला घेऊन जाणं…ही खरंच सुंदर भावना आहे.” असं श्रियाने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
-
दरम्यान, श्रियाने शेअर केलेल्या सुंदर फोटोंवर नेटकऱ्यांसह मनोरंजन विश्वातील कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : श्रिया पिळगांवकर इन्स्टाग्राम )
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…