-
दाक्षिणात्य सिनेमातील लोकप्रिय स्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी २६ फेब्रुवारीला पारंपरिक पद्धतीने स्वप्नवत लग्न केल्याची चर्चा रंगली आहे.
-
लग्नातील लूकसोबतच संपूर्ण डेकोरेेशनही विचारपूर्वक आणि पारंपरिक थीमवर आधारित होते.
-
आज लग्नाचे फोटो शेअर करत ‘विरोश’ने त्यांच्या सगळ्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
-
विजयच्या टेराकोटा आवडीपासून ते त्यांच्या आईंच्या मंत्रांच्या प्रेमापर्यंत प्रत्येक तपशील डेकोरशनमध्ये साकारण्यात आला होता.
-
या सोहळ्यात साधेपणा आणि मुळांशी जोडलेपण जपण्यावर विशेष भर देण्यात आला होता.
-
रश्मिकाने भव्य पालखीमधून रॉयल एन्ट्री घेत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
-
एका फोटोमध्ये विजय समारंभिक तलवार हातात घेऊन रश्मिकाची आतुरतेने वाट पाहताना दिसतो.
-
चाहत्यांनी या दृश्यांची तुलना शिव-पार्वतीच्या पौराणिक प्रेमकथेच्या भावनेशी केली.
-
रश्मिकाने ११ खास सोन्याच्या दागिन्यांनी सजलेला पारंपरिक वधू लूक साकारला.
-
विजयने मोठे इयर स्टड्स, नेकलेस, आर्म कफ आणि अँकल कड्यांसह वेगळाच राजेशाही ग्रूम लूक सादर केला.
-
दागिन्यांची संकल्पना, डिझाईन, फिटिंग आणि अंतिम स्टायलिंगसाठी तब्बल १० महिने मेहनत घेतली गेली.
-
अधिकृत फोटोमध्ये विजय घोड्यावरून भव्य एन्ट्री करत खऱ्या अर्थाने राजेशाही लग्नाचा अंदाज साकारताना दिसतो.
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…