-
ऋतुजा देशमुख सध्या ‘लग्नानंतर होईलच की प्रेम’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, तिने साडीतले काही अप्रतिम फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने परिधान केलेली गडद रंगाची सिल्क साडी आणि त्यावरची पारंपरिक दागदागिने तिच्या सौंदर्याला चार चाँद लावत आहेत.
-
मालिकेत ‘मानिनी’ची भूमिका साकारणारी ऋतुजा, पार्थ आणि जिवा या दोन मुलांची आई म्हणून जबाबदारीने वावरताना दिसत आहे.
-
नंदिनी आणि काव्या या तिच्या सुनांसोबतचा तिचा ऑनस्क्रीन वावर प्रेक्षकांना विशेष भावत असून, सासूच्या भूमिकेत तिने स्वतःची वेगळी छाप पाडली आहे.
-
सध्या मालिकेत जिवा-नंदिनी आणि पार्थ-काव्या यांच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू असून, संपूर्ण कुटुंबात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
-
सेटवरील धावपळ आणि कामाचा ताण असूनही ऋतुजाचा चेहरा या फोटोंमध्ये कमालीचा फ्रेश आणि आनंदी दिसत आहे.
-
‘लग्न…. खूप शूट…. खूप जागरण…. थोडे फोटो, बाकी काम आणि धम्माल’ अशी कॅप्शन देऊन तिने कामाच्या ठिकाणची मजा सर्वांसमोर मांडली आहे.
-
मालिकेतील लग्नाचे चित्रीकरण करताना होणारी दगदग आणि जागरण असूनही कलाकारांचा उत्साह मात्र तसूभरही कमी झालेला नाही.
-
(सर्व फोटो सौजन्य: ऋतुजा देशमुख/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…