-
‘तुझ्यात जीव रंगला’फेम अक्षया देवधरने होळीच्या रंगात न्हाऊन निघत आपले खास फोटो चाहत्यांशी शेअर केले आहेत.
-
‘लक्ष्मीनिवास’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अक्षया पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये गुलालाने माखलेली अतिशय सुंदर दिसत आहे.
-
अक्षयाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टला ‘रंगों में लिपटी खुशी Happy Holi You All’ अशी छोटेखानी, पण बोलकी कॅप्शन दिली आहे.
-
पांढऱ्या रंगाचा पंजाबी सूट, हातातील बांगड्या व चेहऱ्यावरचा गुलाल अक्षयाच्या नैसर्गिक सौंदर्याला अधिकच खुलवत आहे.
-
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये अक्षयाचा सोज्वळ आणि मराठमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
डोळे मिटून रंगांच्या उत्सवाचा आनंद घेणारी ‘पाठकबाई’ म्हणजेच अक्षया या फोटोंमध्ये खूपच निरागस दिसत आहे.
-
अक्षया देवधरने कोणत्याही भारी मेकअपशिवाय केवळ नैसर्गिक रंगांच्या उधळणीत आपले हे सुंदर सेल्फी क्लिक केले आहेत.
-
सध्या ‘लक्ष्मीनिवास’ मालिकेत भावना ही भूमिका साकारणारी अक्षया सोशल मीडियावर आपल्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य: अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…