-
मराठी सृष्टीतील लोकप्रिय जोडी अनुष्का पिंपुटकर आणि मेघन जाधव सध्या थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत.
-
लग्नानंतरचा हा त्यांचा पहिलाच परदेश दौरा असून चाहत्यांमध्ये या हनिमून ट्रिपची मोठी उत्सुकता पाहायला मिळतेय.
-
थायलंडच्या ‘माया बे’ किनाऱ्यावर अनुष्काने आपल्या खास लूकने सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे.
-
या फोटोंमध्ये अनुष्काने गडद नारिंगी रंगाचा स्टायलिश को-आर्ड सेट परिधान करून चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
-
अभिनेता मेघन जाधव पांढऱ्या शर्ट आणि प्रिंटेड शॉर्ट्समध्ये आपल्या पत्नीसोबत कुल अंदाजात दिसत आहे.
-
अनुष्काने हे फोटो शेअर करताना “Vacay Vibes” असे छोटे पण अर्थपूर्ण कॅप्शन देऊन आनंद व्यक्त केला.
-
निळेभोर पाणी आणि विशाल डोंगर यांच्या पार्श्वभूमीवर या जोडीचे फोटो अतिशय सुंदर दिसत आहेत.
-
कामातून ब्रेक घेत या जोडीने थायलंडच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांची सफर करण्यास पसंती दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अनुष्का पिंपुटकर/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…