-
रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडा सध्या त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. देशभरात या जोडीच्या लग्नाची चर्चा होती.
-
रश्मिका व विजय यांनी खास कॅप्शन देत त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन संगीत सोहळ्याचे एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
-
रश्मिकाने या फोटोंना “आनंदाचे अश्रु, प्रेम, संगीत आणि हास्याने भरलेली संपूर्ण रात्र अनुभवली. ही एक अविसमर्णीय रात्र आहे. विजू आणि मी एकमेकांना, आमचे कुटुंबीय आम्हाला. सर्वांनाच एकमेकांना सरप्राइज द्यायचं होतं. आमच्याबरोबर आमच्या कुटुंबीयांनाही मनसोक्त नाचताना पाहिलं. मी आणि विजय आमच्या कुटुंबीयांच्या आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींबरोबर एक होऊन नाचत होतो.”
-
विजयनेही संगीत सोहळ्यातील गोड फोटो शेअर करत त्यांना छान अशी कॅप्शन दिली आहे. विजयने बायको रश्मिकाबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करत त्याला “आमच्या संगीत सोहळ्याची रात्र. त्या रात्री आम्ही डोळ्यातून अश्रू येईपर्यंत नाचलो. सगळ्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. सगळ्यांच्या डोळ्यात एकमेकांप्रती आनंद दिसत होता.”
-
रश्मिका व विजय यांनी त्यांच्या कुटुंबीयांबरोबरचेही गोड फोटो शेअर केले आहेत. विजयचा धाकटा भाऊ, रश्मिकाची धाकटी बहीण त्यांचे आई-वडील सर्वजण एकमेकांबरोबर मग्न होऊन थिरकताना दिसत आहेत.
-
रश्मिका व विजय यांनी २६ फेब्रुवारीला उदयपूर येथे थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. लग्नानंतर दोघांनी त्यांचे लग्नातील फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर ते तुफान व्हायरल झाले. अशातच आता या जोडीने त्यांच्या संगीत सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.
-
रश्मिका व विजय यांच्या संगीत सोहळ्यातील लूकबद्दल बोलायचं झालं तर रश्मिकाने राखाडी रंगाचा शरारा आणि त्यावर त्याच रंगाचा ब्लाउज परिधान केला होता. तिच्या या ड्रेसला मागून नेटची लांब अशी झाळीदार ओडणीही असल्याचं दिसतं. तिने गळ्यात डायमंडचा रेखीव नेकलेस परिधान केला होता. अभिनेत्रीने फार दागिने परिधान न करता उठून दिसणारा स्टाइलीश लूक केला होता. कानात आणि गल्यात डायमंडचे दागिने परिधान केले आहेत. तसेच तिच्या या ड्रेसवरही संपूर्ण निळ्या व सिलव्हर रंगाच्या डायमंडची डिझायन आहे.
-
विजयने गडद निळ्या रंगाची स्टाइलीश शेरवाणी परिदान केली होती. त्याच्या ड्रेसवरही डायमंडची डिझायन पाहायला मिळते. विजयने यावर आकाशी रंगाचं डिझायनर ब्लेझर परिधान केलं. यावेळी अभिनेत्याने गळ्यात हिरव्या रंगाचं डायमंडने भरलेलं लॉकेट परिधान केलं होतं.
-
विजय व रश्मिका या डिझायनर संगीत लूकमध्ये रुबाबदार आणि खूप स्टायलीश दिसत आहेत. त्यांच्या या फोटोंखाली त्यांच्या चाहत्यानी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…