-
मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीने नुकतेच तिचे नारिंगी रंगाच्या ड्रेसमधील मनमोहक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
सोनालीने परिधान केलेल्या या गडद नारंगी ड्रेसवर हाताने केलेले नाजूक नक्षीकाम अतिशय उठून दिसत आहे.
-
या लूकला अधिक पारंपरिक टच देण्यासाठी तिने कानात जड सोन्याचे झुमके परिधान केले आहेत.
-
कपाळावर छोटी टिकली आणि मोकळ्या केसांमधील तिचा हा साधा, पण मोहक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
‘हॅप्पी होळी’ म्हणत सोनालीने आपल्या चाहत्यांना या सणाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
-
‘या सणाने आपल्या सर्वांच्या आयुष्यात शांती आणि सकारात्मकता यावी’ अशी सुंदर कॅप्शन तिने पोस्टला दिली आहे.
-
सोनाली लवकरच ‘तिघी’ (Tighee Movie) या बहुप्रतीक्षित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
सोशल मीडियावर तिचे हे फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत असून, चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…