-
कोकणी माणूस आणि शिमगा यांचं एक अतूट नातं आहे. शिमग्यात प्रत्येक कोकणी माणूस आपल्या गावी जातो.
-
सामान्य कोकणी माणसाप्रमाणेच अनेक कलाकारसुद्धा शिमग्यासाठी कोकणात जातात.
-
अशातच ‘बिग बॉस मराठी ६’मधील आयुष संजीव शिमग्यासाठी कोकणातल्या गावी गेला आहे.
-
कोकणात महाड हे आयुषचं गाव असून खास शिमग्यासाठी तो आईवडिलांबरोबर कोकणात गेला आहे.
-
कोकणातल्या गावच्या शिमग्याचे खास फोटो आयुषनं आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
‘शिमगा २०२६’ आणि ‘आपलं मुळ कधीही विसरू नये’, अशी कॅप्शन त्याने या फोटोंना दिली आहे.
-
आयुषने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनीसुद्धा लाईक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)
-
एका फोटोत आयुषचे वडील देवाची पूजा करतनाचा खास क्षणसुद्धा पाहायला मिळत आहे.
-
तसंच एका फोटोत आयुषच्या अवतीभवती त्याचं कुटुंब आणि गावकरी पहायला मिळत आहेत.
-
आयुषने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तो गावच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्याचं पाहायला मिळत आहे.
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…