-
झी मराठी वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ (Savalyachi Janu Savali TV Serial) ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
-
नुकतेच या मालिकेच्या सेटवर होळी (Holi 2026) आणि धुळवडीचा उत्साह पाहायला मिळाला.
-
या मालिकेतील मुख्य अभिनेत्री प्राप्ती रेडकरने (Prapti Redkar) या सेलिब्रेशनचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
रंगांची मनसोक्त उधळण करून आपापसातील हेवेदावे विसरायला लावणारा सण म्हणजे होळी! याच सणाचे औचित्य साधून मालिकेच्या संपूर्ण टीमने सेटवर एकत्र येत धम्माल केली.
-
या फोटोंमध्ये कलाकार रंगात न्हाऊन निघालेले दिसत असून, त्यांच्यातील मैत्री आणि आनंदाची रंगत स्पष्टपणे जाणवत आहे.
-
प्राप्तीने हे फोटो शेअर करताना चाहत्यांना ‘Happy Holi’ म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.
-
“होळी हा केवळ रंगांचा नाही, तर आनंद आणि जल्लोषाचा सण आहे,” अशी भावना या फोटोंमधून व्यक्त होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…