-
झी मराठी वाहिनीवरील ‘तारिणी’ (Taarini TV Serial) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
या मालिकेत लोकप्रिय मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) ‘कौशिकी खांडेकर’ ही मुख्य भूमिका चोख बजावत आहे.
-
सध्या सोशल मीडियावर या मालिकेच्या सेटवरील काही खास फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.
-
फाल्गुन पौर्णिमेनिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना, ‘तारिणी’च्या टीमनेही कामातून वेळ काढत सेटवर होळी आणि धूलिवंदन साजरे केले.
-
अभिज्ञा भावेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रंगात माखलेले काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
यावेळी मालिकेतील सर्व कलाकारांनी एकत्र येत रंगांची उधळण करत होळीचा आनंद लुटला.
-
या फोटोंबरोबरच अभिज्ञा आणि ‘तारिणी’च्या संपूर्ण टीमने प्रेक्षकांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अभिज्ञा भावे/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…