-
मराठी चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेत्री निवेदिता अशोक सराफ (Nivedita Ashok Saraf) या आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात.
-
बालकलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या निवेदिता यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांतून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
-
केवळ चित्रपटच नव्हे, तर मराठी आणि हिंदी मालिकांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
सध्या सर्वत्र होळीचा (Holi 2026 Celebration) उत्साह पाहायला मिळत आहे.
-
या निमित्ताने निवेदिता सराफ यांनी आपला एक खास मराठमोळा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
होळीच्या उत्सवासाठी त्यांनी गुलाबी रंगाची पारंपारिक पैठणी परिधान केली असून, त्यावर साजेसे दागिन्यांचे लेणं त्यांच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे.
-
या फोटोंच्या माध्यमातून त्यांनी आपल्या चाहत्यांना होळी आणि धुळवडीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : निवेदिता सराफ/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…