-
मराठी इंडस्ट्रीतल्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अमृता खानविलकर. आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने अमृता कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेते.
-
नृत्य आणि अभिनयानं चर्चेत राहणारी अमृता सोशल मीडियावरसुद्धा सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते.
-
अशातच अभिनेत्रीनं नुकतेच तिरूपती बालाजीच्या दर्शनाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. तसंच तिनं दर्शनाचा अनुभवसुद्धा शेअर केला आहे.
-
अमृता तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी आईबरोबर गेली होती. तसंच अमृतानं तिथल्या पारंपरिक भोजनाचा आस्वादही घेतला.
-
तिरूपती बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर तिनं भावुक होत म्हटलं, “मागच्या महिन्यात ठरवलं की आपण तिरूपती बालाजीचं दर्शन घ्यायला जायचं आणि आज इकडे आले. दर्शन घेतलं.”
-
यापुढे ती म्हणाली, “इतकं सुंदर दर्शन झालंय की मला आता काही सुचत नाहीय. या सुंदर दर्शनाने माझं हृदय अगदी भरून आलं आहे. दर्शन घेतल्यानंतर मी खूपच भावुक झाले.”
-
अमृतानं तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी पांढऱ्या रंगाची कॉटनची साडी परिधान केली होती. या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो लक्ष वेधून घेत आहेत.
-
दरम्यान, अमृता सध्या ‘लग्न पंचमी’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकातील तिची भूमिका लक्षवेधी असून अभिनेता स्वप्नील जोशीही मुख्य भूमिकेत आहे.
-
स्वप्नील-अमृताच्या या लग्न पंचमी या नाटकाला प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अमृताचं हे पहिलंच नाटक असून तिच्या भूमिकेचं कौतुक होत आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)
Video: डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली; गुंतवणूकदारांच्या परिषदेत म्हणाले, तुम्ही सेक्सवरही…