-
प्रसिद्ध कवी आणि गीतकार संदीप खरे (Sandeep Khare) यांची कन्या, अभिनेत्री रुमानी खरे (Roomani Khare) लवकरच अभिनेता स्तवन शिंदेबरोबर (Stavan Shinde) विवाहबंधनात अडकणार आहे.
-
नुकताच या जोडीचा मेहंदी सोहळा दिमाखात पार पडला असून, त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
मेहंदी सोहळ्यासाठी रुमानीने फिकट जांभळ्या रंगाचा अतिशय सुंदर ड्रेस परिधान केला होता.
-
रुमानीने तिच्या या खास क्षणांचे फोटो शेअर करताना ‘And It Begins’ असे कॅप्शन दिले आहे.
-
लग्नापूर्वीच्या विधींना त्यांच्या घरी सुरुवात झाली असून, रुमानीच्या हातावर स्तवनच्या नावाची मेहंदी रंगली आहे.
-
तसेच, रुमानीने ‘ग्रहमख’ सोहळ्याची खास झलकही चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
-
डिसेंबर २०२५ मध्ये रुमानी आणि स्तवनचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुमानी खरे/इन्स्टाग्राम)
२७ वर्षांचं अंतर नाहीच…! नवऱ्यापेक्षा फक्त ‘इतक्या’ वर्षांनी लहान आहे सोनाली खरे; थेट सांगितलेली जन्मतारीख, ट्रोलर्सना म्हणाली…