-
पॉप आयकॉन ब्रिटनी स्पीयर्सला कॅलिफोर्नियातील व्हेंचुरा काउंटीमध्ये बुधवारी अटक करण्यात आली. (फोटो – X/ Britney Spears)
-
दारू पिऊन गाडी चालवल्याच्या संशयावरून तिला अटक करण्यात आली होती. (फोटो – X/ Britney Spears)
-
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तिला अटक करण्यात आली. पहाटे तीनच्या सुमारास तिच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. (फोटो – X/ Britney Spears)
-
दरम्यान, अटक केल्यानंतर काही तासांनी चौकशी करुन दुसऱ्या दिवशी पहाटे सहाच्या सुमारास तिची सुटका करण्यात आली. (फोटो – X/ Britney Spears)
-
दारुच्या नशेत वाहन चालविल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला असून, ०४ मे रोजी याबाबत कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. (फोटो – X/ Britney Spears)
-
पॉप गायिका ब्रिटनी स्पीयर्स संगीत विश्वात खूप प्रसिद्ध असून, लाखो संगीत प्रेमी तिचे चाहते आहेत. (फोटो – X/ Britney Spears)
-
ब्रिटनी स्पीयर्सने तिच्या संगीत अल्बम आणि संबंधित अधिकार प्रायमरी वेव्ह या कंपनीली विकल्याची माहिती आहे. (फोटो – X/ Britney Spears)
-
पॉप संगीतातील आयकॉन म्हणून प्रसिद्ध असली तर ब्रिटनी गेल्या काही वर्षापासून स्पॉटलाईटपासून दूर आहे. (फोटो – X/ Britney Spears)
-
अलिकडे २०१९ मध्ये तिने डॉमिनेशन प्रोजेक्ट हाती घेतला होता पण, काही कारणास्तव तो लांबणीवर पडला. (फोटो – X/ Britney Spears)
-
दरम्यान, ब्रिटनीला अटक आणि नंतर सुटका झाल्यानंतर पुन्हा एकदा तिच्याबाबत चर्चा होऊ लागली आहे. (फोटो – X/ Britney Spears)