-
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला सोशल मीडिया इन्फ्लूएंसर म्हणजे धनंजय पोवार.
-
‘बिग बॉस मराठी’सारख्या शोमध्ये आल्यावर त्याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत आणखीनच वाढ झाली.
-
धनंजय सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करीत असतो.
-
धनंजय सोशल मीडियाद्वारे विविध मुद्द्यांवर स्वत:ची मतं व्यक्त करीत असतो.
-
सध्या सुरू असलेल्या बिग बॉस मराठी ६ मधील स्पर्धक आणि खेळाबद्दलही तो त्याचं मत स्पष्टपणे मांडतो.
-
अशातच त्यानं शेअर केलेली एक स्टोरी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. यात त्यानं स्वत:च्या फोटोसह त्यानं एक पोस्ट शेअर केली आहे
-
या पोस्टमधून धनंजय म्हणतो “आयुष्य एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलंय. हक्काच्या माणसांना चुकीचं वागताना पाहतोय. पण काहीच बोलू शकेना”.
-
तसंच यापुढे तो म्हणतो, “मग म्हटलं मरु द्या. सुरुवातीपासून एकटाच तर होतो…”, त्याची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
-
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी ५’नंतर प्रसिद्धीझोतात आलेला डीपी ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमातसुद्धा दिसला होता. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
Sunil Gavaskar: “हे चुकीचं आहे”, बुमराहच्या षटकादरम्यान घडलेल्या प्रकारावर सुनील गावसकर संतापले; म्हणाले…