-
स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘मुरांबा’ (Muramba TV Serial) सध्या रंजक वळणावर असून, प्रेक्षकांकडून या मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) ‘रमा’ ही मुख्य भूमिका साकारत असून तिच्या साध्या आणि सोज्वळ रूपावर चाहते फिदा आहेत.
-
नुकताच मालिकेत रमा आणि अक्षयचा शाही विवाहसोहळा पार पडला.
-
या खास प्रसंगी शिवानीने जांभळ्या रंगाची नक्षीदार नऊवारी साडी साडी नेसली होती.
-
या लूकला अधिक उठावदार करण्यासाठी शिवानीने त्यावर पारंपारिक भरजरी दागिन्यांचा साज केला होता.
-
आनंदाची बाब म्हणजे, ‘मुरांबा’ मालिकेने नुकताच १३०० भागांचा यशस्वी टप्पा गाठला आहे.
-
या यशाबद्दल भावना व्यक्त करताना स्टार प्रवाहची टीम म्हणाली, “या १३०० भागांच्या प्रवासात प्रेक्षकांनी आम्हाला जी मोलाची साथ आणि प्रेम दिले, त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. तसेच मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि सर्व तंत्रज्ञांचेही मनापासून अभिनंदन!”
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)
आईशप्पथ, काकू काय नाचलात… ‘राजा जी के तुरल’ गाण्यावर काकूंनी केला भोजपुरी स्टाईल डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “तुम्ही या वयात पण…”