-
शिमगोत्सव ( होळी ) आणि कोकणी माणसाचं नातं अतूट आहे. दरवर्षी वेळात वेळ काढून, सुट्ट्या घेऊन कोकणवासी शिमगा साजरा करण्यासाठी गावी पोहोचतात.
-
मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार सुद्धा शिमग्यासाठी कोकणात पोहोचले आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता निखिल बने देखील दरवर्षी शिमगा साजरा करण्यासाठी आपल्या गावी जातो.
-
यावर्षी प्रेक्षकांचा लाडका निखिल बने… ना रेल्वे, ना बस…तर स्वत:ची बाईक घेऊन कोकणात पोहोचला होता. याचे खास फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
चिपळूणमधील कापरे हे निखिलचं गाव आहे. या गावात कोकणी परंपरेनुसार गेली वर्षानुवर्षे शिमगोत्सव साजरा केला जातो.
-
शिमग्याला घराघरांत ग्रामदेवीची पालखी येते. देवाची पालखी खांद्यावर घेऊन ती नाचवण्याची ( खेळे ) खास परंपरा देखील कोकणात आहे.
-
पालखी घरी आल्यावर ग्रामदेवतेची ओटी भरून, पूजा करून मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो.
-
निखिलच्या फोटोंमध्ये देवाची पालखी, नमन, कोकणातील परंपरा या सगळ्याची झलक पाहायला मिळतेय.
-
“शिमगोत्सव २०२६…सिताई पावणाई चांगभलं! भारताने World Cup आणि कोकणी माणसाने पालखी उचललीच पाहिजे… श्री देव नागार्जुन, कापरे” असं कॅप्शन अभिनेत्याने या फोटोंना दिलं आहे.
-
निखिलने गावच्या परंपरेचं, कोकणातील शिमगोत्सवाचं फोटो-व्हिडीओच्या माध्यमातून दर्शन घडवल्यामुळे चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : निखिल बने इन्स्टाग्राम )
Viral Dance Video: ‘इश्क तेरा तडपावे..’ गाण्यावर हार्दिक- इशानचा भन्नाट डान्स! अदिती हुंडिया अन् महिका शर्माच्या डान्सने वेधलं लक्ष, पाहा Video