-
‘रात्रीस खेळ चाले’ ही थ्रिलर मालिका घराघरांत प्रचंड लोकप्रिय होती. यामध्ये शेवंताची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने साकारली होती. आज मालिका संपून अनेक वर्षे उलटली असली तरीही अपूर्वाला घराघरांत शेवंता म्हणून ओळखलं जातं.
-
अपूर्वा नुकतीच विवाहबंधनात अडकली. अभिनेत्रीचा विवाहसोहळा १४ फेब्रुवारी थाटामाटात पार पडला. लग्नानंतर अभिनेत्री पतीसह गोवा फिरायला गेली होती. आता गोवा ट्रिपनंतर अपूर्वा सिंधुदुर्ग भ्रमंती करणार आहे.
-
सिंधुदुर्गात आल्यावर अपूर्वाने सर्वात आधी नाईकांच्या वाड्याला भेट दिली. या वाड्यात काही वर्षांपूर्वी ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेचं शूटिंग झालं होतं.
-
आपल्या पतीसह अपूर्वा हा भव्य, जुना कोकणातील वाडा पाहण्यासाठी गेली होती. या घराला आता सगळेजण ‘नाईकांचा वाडा’ म्हणून ओळखतात.
-
हळदी रंगाची साडी, गळ्यात मंगळसूत्र…या साध्या अन् सिंपल लूकमध्ये अपूर्वा खूपच सुंदर दिसतेय. अपूर्वाने या फोटोंना मजेशीर कॅप्शन दिलं आहे.
-
“काळजी करू नका मित्रांनो, तो इथे अण्णांना शोधण्यासाठी आलेला नाहीये” असं भन्नाट कॅप्शन अपूर्वाने या फोटोंना दिलं आहे.
-
नाईकांच्या वाड्याला अपूर्वाने पुन्हा एकदा भेट दिल्यावर चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. नेटकऱ्यांनी तिच्याकडे या मालिकेबद्दल खास मागणी केली आहे.
-
“अपूर्वा मॅम ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेचा चौथा सीझन आमच्या भेटीला आणा” अशा कमेंट्स चाहत्यांनी या फोटोंवर केल्या आहेत. याशिवाय “शेवंता इज बॅक”, “शेवंता आणि अण्णा नाईक आम्ही कधीही विसरणार नाही” अशा बऱ्याच कमेंट्स अभिनेत्रीच्या पोस्टवर आल्या आहेत.
-
दरम्यान, अपूर्वाने ‘नाईकांचा वाडा’ पाहिल्यावर पतीसह सातेरी देवी आणि सिंधुदुर्गातील अन्य काही मंदिरात जाऊन दर्शन सुद्धा घेतलं. याचेही सुंदर फोटो तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर इन्स्टाग्राम )
शनीची साडेसाती बिघडवणार गेम! ‘२’ राशींच्या लोकांचं जगणं करणार कठीण, आयुष्यात आणणार वादळ? पण ‘या’ एका राशीला दाखवणार अच्छे दिन!