-
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) १९९३ मध्ये ‘बाजीगर’ या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले.
-
शिल्पाचा प्रवास केवळ अभिनयापुरता मर्यादित नाही; ती एक यशस्वी उद्योजिका, फिटनेस आयकॉन आणि लेखिका म्हणूनही नावलौकिक मिळवून आहे.
-
शिल्पाच्या नव्या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
-
या फोटोशूटसाठी शिल्पाने लाल आणि हिरव्या रंगाच्या साडीला पसंती दिली असून, तिचा हा लूक चाहत्यांना भुरळ घालत आहे.
-
तर, शिल्पाचे पती राज कुंद्राने (Raj Kundra) हिरव्या रंगाचा बांधणी कुर्ता सूट आणि त्यावर जॅकेट परिधान केले आहे.
-
फोटोंमध्ये शिल्पा आणि राजची केमिस्ट्री दिसून येत असून, दोघेही रोमँटिक अंदाजात पाहायला मिळत आहेत.
-
शिल्पा शेट्टी आजही तिच्या योगाभ्यास आणि फिटनेससाठी ओळखली जाते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांना फिटनेस आणि वर्कआउटसाठी प्रेरित करत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिल्पा शेट्टी/इन्स्टाग्राम)
Robert Kiyosaki: “मी पुन्हा एकदा इशारा देत आहे”, कोसळत असलेल्या शेअर बाजाराबाबत ‘रिच डॅड पुअर डॅड’च्या लेखकाची पोस्ट चर्चेत