-
स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता नवनाळे.
-
प्राजक्ता सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक स्टायलिश फोटो शेअर करत असते.
-
तसंच प्राजक्ता व्यायामाची विशेष आवड असून जिममधील फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती पोस्ट करत असते.
-
अशातच अभिनेत्रीनं नवीन कार खरेदी केली असून याचा खास व्हिडीओ तिनं आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे
-
प्राजक्तानं Curvv EV ही गाडी खरेदी केली आहे. Financial Express नुसार, गाडीची किंमत २२.२४ लाख रुपये आहे.
-
प्राजक्तानं एका वर्षात दुसरी नवीन कार खरेदी केली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात तिनं Harrier कार खरेदी केली होती.
-
नवीन कार घेतल्याबद्दल अनेक मराठी कलाकार आणि तिच्या चाहत्यांनी प्राजक्ताला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
‘येड लागलं प्रेमाचं’ या लोकप्रिय मालिकेत प्राजक्ता मंजिरीची बहीण ऋतुजा ही भूमिका साकारत आहे.
-
‘येड लागलं प्रेमाचं’ विशाल निकम आणि पूजा बिरारी हे कलाकार राया-मंजिरीच्या मुख्य भूमिकांत आहेत.
-
प्राजक्तानं याआधी ‘जीव माझा गुंतला’, तसेच ‘मुलगी झाली हो’ या मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)
“तुमची संपत्ती १४ कोटी अन् कर्ज…”, मुख्यमंत्री फडणवीस यांचा ठाकरेंच्या आमदाराला टोला